Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट , फळबागांची दाणादाण
़राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर वाढलाय. रविवार सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात अवकाळी अक्षरश: तांडव केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये.
छञपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिलाय.
करमाड, शेकटा,आणि करंजगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
बिडकिन शिवारात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पपईच्या बागांना बसला असून हे पीक आडवे झाले आहे.
त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय.
शिवाय उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटाका बसलाय.
अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.