Eknath Shinde Dasara Melava 2023 : 'त्यांना खोके पुरत नाही, कंटेनर लागतात'; आझाद मैदानावर एकनाथ शिंदे बरसले, भाषणाचे महत्त्वाचे 10 मुद्दे
गेल्यावेळीच शिवतीर्थावर मेळावा घेऊ शकलो असतो, पण मी म्हंटल जिथे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडता येतात, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'शिवसेनेची काँग्रेस झाली तर दुकान बंद करीन म्हणणारे बाळासाहेब आणि आता कदाचित उरली सुरली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन केली तर आश्चर्य वाटायला नको...'
सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही... करणार नाही. रक्ताचं नाते सांगणाऱ्यांनी हिंदुत्वचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आम्हाला दिल्यानंतर यांनी बँकमधील 50 कोटी रुपये मागितले.. पण बँकने नकार दिला. मी 50 कोटी रुपये द्यायला लावले. खोके त्यांना पुरत नाही... त्यांना कंटेनर हवा. मी साक्षीदार आहे.. योग्य वेळी बोलेन.
उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्ह गेल्यावर बँकेकडे 50 कोटी मागितले, ते 50 कोटी मीच त्यांना द्यायला सांगितले.
यांना खोके पुरत नाहीत, यांना कंटेनर लागतात असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठया खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती. बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यानी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आजही रस्त्यावर उतरून काम करत आहे.
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा आरक्षण देणारच, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दसरा मेळाव्यात दिला आहे.
उद्या एम आय एम ओवेसी सोबत युती करतील. हमास हिजबुल लष्कर ए तोयबा यांच्याशी देखील युती करतील. शिवसैनिक जगला काय मेला काय त्यांचं याना काही नाही फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढच यांना माहित.
तो दसरा मेळावा नाही... शिमगा आहे. आता तिकडे टोमणे सभा सुरु असेल. दसरा मेळावा शिमगाला घ्यावा. पवार साहेबांकडे 2 माणसे पाठवली आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या नावाची शिफारस करायला लावली. 2004 पासून यांना मुख्यमंत्री व्हायचं होते. सीतेच हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतले होते... पण मुख्यमंत्री होण्यासाठी हे संधीसाधू बनले.
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला ज्या मणिशंकर आययरला बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारले त्यांच्यासाठी पायघड्या टाकतायत..