Uddhav Thackeray Dasara Melava : पुण्याहून निघालेली शिवज्योत शिवतीर्थावर दाखल!

शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत.

थोड्याच वेळात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा सुरु होणार आहे.
पेटती मशाली घेऊन पुण्याचे शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झालेत.
दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत.
आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे (Shiv Sena Dasara Melava) लागले आहे.
काही महिन्यातच होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा होणार आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे सरकार असणार आहे.
शिवतीर्थावर होत असलेल्या दसरा मेळाव्याला राज्यभारातील शिवसैनिकांचा ताफा दाखल होत आहे. पेटती मशाली घेऊन पुण्याचे शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले.