PHOTO: शिवाजी पार्कात तुफान गर्दी; ठाकरेंची तोफ धडाडणार!
संपूर्ण मुंबई नगरी ही दसरा मेळाव्याच्या लगबगीने सज्ज झालीये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाजी पार्कात दरवर्षीप्रमाणे ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
त्यासाठी शिवसैनिक राज्यभरातून शिवाजी पार्कात दाखल झाले आहे.
दरम्यान शिवसेना भवन परिसरामध्ये शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळाला.
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
यावेळी या जल्लोषात मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग पाहायला मिळाला.
ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे शिवाजी पार्कात दाखल होत आहेत.
दादर शिवाजी पार्कात ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.
या दसरा मेळाव्याला अनेक दिग्गज व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
पेटती मशाल घेऊन अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झालेत.
दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत.