दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
विशेष म्हणजे दिल्ली दौऱ्यात फडणवीसांनी भाजपच्या 7 वरिष्ठ नेत्यांना भेटून मूर्ती भेट दिल्या. त्यामध्ये, विविधता दिसून आली, 5 वेगवेगळ्या मूर्ती त्यांनी नेत्यांना दिल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दरबारी गेले होते. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील या सदिच्छा भेटीतही महाराष्ट्रीयन संस्कृतीचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दिल्ली दौरा होता.
भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना गाय-वासरुची मूर्ती भेट देऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि नितीन गडकरींना मुंबईतील सिद्धीविनायक गणपती बाप्पांची मूर्ती भेट देत त्यांनी सदिच्छा भेट घेतली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट दिल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि नितीन गडकरींना मुंबईतील सिद्धीविनायक गणपती बाप्पांची मूर्ती भेट देत त्यांनी सदिच्छा भेट घेतली.