Dasara Melava 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मनोज जरांगे पाटील, कोणावर टीका तर कोणाचं कौतुक; ठाकरेंच्या भाषणाचे ठळक 10 मुद्दे
उद्धव ठाकरे यांनी भाषणावेळी मनोज जरांगे यांचे आभार मानले. त्यांनी शांततेत सुरु ठेवलेल्या आंदोलनाचं आणि धनगर समाजाला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यांचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमी मुख्यमंत्री असताना कधी कुणावर लाठीचार्जचा आदेश दिला होता का? पोलीस वरून आलेल्या आदेशानंतरच लाठीचार्ज केला. मग जालन्याचा हा जनरल डायर कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
अपात्रेतेच्या निर्णयाचा खेळखंडोबा सुरु आहे. पण मला सर्वोच्च न्यायालयावर आणि जनेतेच्या कोर्टावर विश्वास असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी टोला लगावला.
मोदी सरकार गेलंच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेलं सरकार नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.
गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावं यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातोय. मुंबई लुटण्याचा डाव आखला जातोय. मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दारामध्ये तिला उभं करायंच आहे, त्यासाठी हा घाट घातला जातोय. पण जे मुंबई तोडतील त्यांना आम्ही तोडू, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन दिला.
कोरोना काळात ज्या मुंबई मोडेलचं कौतुक संपूर्ण जगाने केलं, त्या मुंबईतील कोविड काळातील गोष्टी सध्या घोटाळे म्हणून बाहेर काढले जात आहेत. जर तुम्ही मुंबईची चौकशी करताय तर तुम्ही नागपूरची पण चौकशी करा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
जर तुम्ही मुंबईची चौकशी करताय तर पीएम केअर फंडाची आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीये.
'मुंबईसह आता हे धरावी देखील गिळणार आहेत. मी धारावीचा विषय धारावीमध्ये जाऊन पाहणार आहे. धारावीचा विकास झालाच पाहिजे, पण हक्काबरोबर जे उद्योगधंदे आहेत त्यांनी देखील सुविधा मिळायला हव्यात. पण यावेळी गिरणी कामरांच्या मुलांना देखील घरं द्या,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांनी सरकारला केलं आहे.