पंकजा मुंडे-प्रकाश आंबेडकर यांची भेट, राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा!
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि भाजपाच्या नेत्या तथा आमदार पंकजा मुंडे यांची भेट झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रकाश आंबेडकर आज लातूरहून बीडकडे येत होते. यावेाळी पंकजा मुंडे आणि आंबेडकर यांची भेट झाली.
पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.
सध्या प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
त्यांची हीच यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे.
त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं आहे.
पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यातील मोठ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास ते टिकणार नाही, असे म्हटले होते.
त्यानंतर त्यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या यात्रेत ते लोकांशी संपर्क साधत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना या यात्रेत सामील होण्याचे आवाहन करणारे पत्र लिहिले होते.
त्यानंतर आत पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले.
पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
image 11
या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो सौजन्य- एबीपी माझा, प्रतिनिधी
फोटो सौजन्य- एबीपी माझा, प्रतिनिधी