हावडा-मुंबई एक्सप्रेसचे तब्बल 18 डब्बे धडाधड रुळावरुन घसरले; एअर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल
झारखंडमधील चक्रधरपूर येथे आज (30 जुलै) पहाटे भीषण रेल्वे अपघात झाला. गाडी क्रमांक 12810 हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे चक्रधरपूरजवळ 18 डब्बे रुळावरून घसरले. (Image Credit-ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदर अपघातामध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Image Credit-ANI)
मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे अपघात राजखर्सवान वेस्ट आऊटर आणि बारांबू स्थानकांदरम्यान पहाटे 4 वाजता झाला. (Image Credit-ANI)
रेल्वेच्या वैद्यकीय पथकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. (Image Credit-ANI)
सर्व जखमींवर भारतीय रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार केले आहेत.(Image Credit-ANI)
झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये झालेल्या या रेल्वे अपघाताची फोटोही समोर आली आहेत. हा अपघात भीषण असल्याचे फोटोत दिसत आहे. अपघातामागील कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Image Credit-ANI)
हावडा-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनचा अपघात झाला तेव्हा बाजूच्या रुळावर एक मालगाडी उभी होती. रुळावरून घसरलेले डब्बे त्याच मालगाडीला धडकले.(Image Credit-ANI)
जखमींना बाहेर काढून एअर ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात येत आहे. (Image Credit-ANI)