Happy Birthday Sonu Sood : मुंबईत आल्यावर खिशात 5 हजार, आता 140 कोटींचा मालक; सोनू सूदची संघर्षकथा माहिती आहे का?

सोनू सूद बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने स्वत:च्या हिमतीवर चित्रपटसृष्टीत आपले नाव कमवले आहे. सोनू सूद पहिल्यांदा मुंबईला आला होता, तेव्हा त्याच्याकडे फक्त पाच हजार रुपये होते.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आज 51 वा बर्थडे सेलिब्रेट करतोय. बर्थडेनिमित्त सोनू सूदविषयी थोडक्यात जाणून घेऊ या..

1/8
'शहीद ए आजम' या चित्रपटापासून अभिनेता सोनू सूदने आपल्या करियरला सुरुवात केली. 2002 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर सोनूने आपल्या अॅक्टिंगच्या करियरमध्ये मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटानंतर त्याने अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केले. (P.C sonu_sood)
2/8
सोनू सूद या अभिनेत्याने हिंदी चित्रपटासोबतच दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केले. (P.C sonu_sood)
3/8
खूप कमी लोकांना माहिती आहे की, सोनू सूद फक्त पाच हजार रुपये घेऊन ड्रिम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात आला होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर आज तो कोट्यधीश आहे. (P.C sonu_sood)
4/8
सोनू सूद आज 135 ते 140 करोड रुपयांचा मालक आहे. सोनू सूद चित्रपटांसोबतच जाहिराती तसेच रियालीटी शोंमधून भरपूर कमाई करतो. (P.C sonu_sood)
5/8
सोनू सूद या अभिनेत्याचं अंधेरी वेस्ट लोखंडवाला या परिसरात आलिशान घर आहे. त्या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. (P.C sonu_sood)
6/8
या अभिनेत्याला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. पोर्शे पनीमेरा तसेच मर्सिडीझ बेंझ एमएल-क्लास यासारख्या आलिशान गाड्या त्याच्या गॅरेजमध्ये आहेत. (P.C sonu_sood)
7/8
सोनू सूद एका चित्रपटाचे पॅकेज 2-3 करोड रुपये घेतो. (P.C sonu_sood)
8/8
सोनू सूद लवकरच 'फतेह'या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (P.C sonu_sood)
Sponsored Links by Taboola