मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं

बीड जिल्ह्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह मुख्य सुत्रधार व आरोपींना अटक करण्याची मागणी करत बीडची जनता आज रस्त्यावर उतरली होती. बीडमधील आंबेडकर चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीडमधील या मूक मोर्चासाठी राज्यातून काही बडे नेते, आमदार बीडमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये, संभाजीराजे छत्रपती, नरेंद्र पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अभिमन्यू पवार, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळुंके, बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील हे सर्वजण उपस्थित होते.

बीडमध्ये उपस्थिती राहिलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे पहिल्यांदा भाषणाला उभारले. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकलून काढलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दुसऱ्या नंबरवर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भाषण केले. लवकरात लवकर आरोपींना अटक न केल्यास हा रोष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल, असे त्यांनी म्हटले.
तिसऱ्या नंबरवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी भाषण केल. आजचा मोर्चा कुठल्या जातीचा नसून सर्वधर्माचे लोकं मोर्चात आहेत, एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी 4 थ्या क्रमांकावर भाषण केलं. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर राज्यभरात मोठं आंदोलन उभारलं जाईल, असेही सोळंके यांनी म्हटलं.
आमदार सुरेश धस यांनी पाचव्या क्रमांकावर भाषण केलं, त्यांनी आपल्या भाषणातून घटनेची थरारक कहाणी सांगत मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंना लक्ष्य केलं.
सुरेश धस यांच्यानंतर 6 व्या क्रमांकावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केलं. वेळेत कारवाई झाली नाहीतर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नसल्याचे आमदार आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाडनंतर 7 व्या क्रमांकावर खासदार बजरंग सोनवणे यांनी भाषण केल. धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि हत्याप्रकरणाची चौकशी होऊ द्या, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.
आठव्या क्रमांकावर मनोज जरांगे पाटील यांनी भाषण केलं. जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. तसेच, राज्य सरकारलाही इशारा दिला.
उपस्थित प्रमुख नेत्यांमध्ये 9 व्या क्रमांकावर म्हणजेच सर्वात शेवटी भाषण छत्रपती संभाजीराजे यांनी केलं. संभाजीराजे यांनीही संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असे म्हटले आहे.