उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार अपघातात मेट्रोचा काम करणारा एक कामगाराचा जागेवरच मृत्यू तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारचा चुराडा झाला आहे.
या अपघातात कार चालक आणि मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
सुदैवाने अपघाता वेळी कारचा एअरबॅग उघडल्यामुळे अभिनेत्री आणि कारचालक वाचले आहेत.
मराठी अभिनेत्री शूटिंग करून मध्यरात्री दहिसर कडून कांदिवलीकडे येत असताना कांदिवली बोईसर मेट्रो स्टेशन जवळ कारचा मोठा अपघात झाला आहे.
कारचालक भरधाव वेगाने कार चालवत असताना कार वरून नियंत्रण सुटला आणि मेट्रोचा काम करणारे कामगार यांचे अंगावरून कार घेऊन गेल्यामुळे एक कामगार जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळतात समता नगर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन कार आपला ताब्यात घेऊन कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहेत.
कार चालकाने दारू पिऊन कार चालवत होता का यासंदर्भात समता नगर पोलिसांनी कार चालकाचा ब्लड सॅम्पल घेऊन लॅबला तपासासाठी पाठवले आहेत.
मराठी अभिनेत्री शूटिंग करून मध्यरात्री दहिसर कडून कांदिवलीकडे येत असताना कांदिवली बोईसर मेट्रो स्टेशन जवळ कारचा मोठा अपघात झाला आहे.