... तर पुढील 5 वर्षे ही योजना चालेल; हातात राख्या, अंगात गुलाबी जॅकेट अन् अजित दादाचा दावा
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चलती आहे. या योजनेसाठी तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असून लवकरच महिलांना पहिला हफ्ताही दिला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार असून 17 ऑगस्ट रोजी योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठीच्या फाईलवर अर्थमंत्री अजित पवार यांनी सहीही केली आहे.
माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे. गावागावात, पाड्यावर, वाडीवस्तीवर सगळीकडं माहिती झालीय की, अशी योजना आलीय. गावाकडं आई स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते. पण, तिलाही वाटत असेल कुठतरी जत्रेत जावं, काहीतरी घ्यावं.
महिलांच्या या आशा, अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. आया बहिणींनो, माय माऊलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हा अजित दादांचा वादा आहे.
माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच, मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय, असे अजित पवार यांनी दिंडोरीतील यात्रेतून सांगितले.
माझी विनंती आहे, ते पैसे तुमच्या स्वत:साठी खर्च करा, वर्षभरासाठी 46000 कोटी रुपये आपण खर्च करत आहोत. विरोधकांकडून टीका केली जातेय की हा चुनावी जुमला आहे, पण माय माऊलींनो मी तुम्हाला सांगतो.
हे तात्पुरतं नाही. तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशीर्वाद द्या. पुढील 5 वर्षे ही योजना चालेल हा अजित दादाचा वादा आहे, असे म्हणत पुढील 5 वर्षे ही योजना चालेल असा शब्दच अजित पवारांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील महिलांना दिला.