पाच दिवसांत संपूर्ण पगार संपतो? मग 30-30-30-10 फॉर्म्युला वापरा अन् करा भरपूर बचत!
जवळपास प्रत्येकाची पगार शेवटपर्यंत पुरत नाही. पगार झाला की अवघ्या पाच ते दहा दिवसांत तो संपतो, अशी तक्रार अनेकजण करतात. या अशआ परिस्थितीमुळे अनेकांना सेव्हिंग करता येत नाही. मात्र 30-30-30-10 हा फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही पैशांची बचत करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सूत्राच्या मदतीने तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. या सूत्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या पगाराचे भाग करावे लागतील. या सूत्रात दिल्यानुसार तुम्हाला तुमच्या पगारातील रक्कम वेगवेगळ्या भागासाठी निश्चित करावी लागेल.
या सूत्रानुसार तुमच्या एकूण पगारातील 30 टक्के रक्कम घरातील खर्चासाठी ठेवावी लागेल. समजा तुमचा पगार 50 हजार रुपये आहे. तर या सूत्रानुसार 30 टक्के म्हणजेच साधारण 15 हजार रुपये तुम्हाला घरातील खर्चासाठी बाजूला काढून ठेवावे लागतील. यात तुमचे रुम रेंट, होम लोनचा ईएमआय येईल.
तुमच्या पगाराचा दुसरा हिस्सा म्हणजेच साधारण 30 टक्के रक्कम तुम्हाला गरजेच्या वस्तूंवर खर्च करायची आहे. यामध्ये ग्रॉसरी, युटिलीटी बील, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आदी खर्च येईल. तुमचा पगार 50 हजार रुपये आहे असे गृहित धरल्यास तुम्हाला 50 टक्के म्हणजेच 15 हजार रुपये या कामासाठी ठेवावे लागतील.
तुमच्या पगाराचा तिसरा 30 टक्के हिस्सा हा आर्थिक बचत, सेव्हिंगसाठी ठेवावा. तुमचा पगार 50 हजार रुपये असेल अशे गृहित धरल्यास 30 टक्के म्हणजेच 15 हजार रुपये आर्थिक बचतीसाठी ठेवायला हवेत.
उर्वरीत 10 टक्के रक्कम मौज-मजा करण्यासाठी खर्च करता येतील. म्हणजेच फिरायला जाणे, जेवण तसेच अन्य कामांसाठी हे पैसे खर्च करता येतील. तुमचा पगार 50 हजार रुपये असल्याचे गृहित धरल्यास 10 टक्के रक्कम म्हणजेच 5 हजार रुपये या कामासाठी ठेवावेत.
सांकेतिक फोटो