लाखो दिलों की धडकन, महाराष्ट्राची सून, 15 व्या वर्षापासून अभिनय करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
अभिनेत्री जिनिलिया डिसूजाने हिंदी चित्रपटातच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही अभिनय केला आहे. ( P.C geneliad )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री जिनिलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 रोजी झाला. जिनिलिया मंगलोरियन कॅथोलिक परिवारातून येते. अभिनेत्री जिनिलियाचे नाव तिची आई जेनेट आणि वडील नील या दोघांच्या नावावरुन जिनिलिया असे ठेवण्यात आले. ( P.C geneliad )
अभिनेत्री जिनिलियाने आपल्या करिअरला वयाच्या 15 व्या वर्षी सुरुवात केली. तिने सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते 'अमिताभ बच्चन' यांच्यासोबत पहिल्यांदा अभिनय केला. ( P.C geneliad )
कमी वयात जिनिलियाने 'बिग बीं'सोबत पार्कर पेनची जाहिरात केली होती. त्यानंतर जिनिलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ( P.C geneliad )
अभिनेत्री जिनिलियाचा पहिला चित्रपट 2003 साली रिलीज झाला होता. त्यानंतर अभिनेता रितेश देशमुखसोबत जिनिलिया 'नजर' या चित्रपटात दिसली. या चित्रपटादरम्यान रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्यांत मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ( P.C geneliad )
अभिनेत्री जिनिलिया आणि अभिनेता रितेश यांनी मराठी रितीरिवाजानूसार 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केलं. ( P.C geneliad )
अभिनेत्री जिनिलिया एका चित्रपटासाठी तब्बल 1-3 कोटी रुपये फिस घेते. जिनिलिया तब्बल 42 कोटींची मालकीण आहे. ( P.C geneliad )