एक्स्प्लोर
Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, आरे ते बीकेसी भूमिगत मेट्रो सुरु होणार, तिकीट दर ते फेऱ्या, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mumbai Metro 3 : मुंबईतील मुंबई मेट्रो 3च्या आरे ते बीकेसी या दरम्यानच्या सेवेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. यामध्ये एकूण 9 स्थानकं आहेत.
मुंबई मेट्रो 3
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मेट्रो 3 हा प्रकल्प एकूण 33.5 किलोमीटरचा आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12.44 किमीवरील सेवा सुरु होणार आहे.
2/7

मुंबई मेट्रो 3 च्या कामाला 7 वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गावरील काम पूर्ण झालं आहे. आरेमध्ये मेट्रोचं कारशेड असून बीकेसी ते सीप्झ या दरम्यान प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
3/7

बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरु आहे. पुढच्या वर्षी हा टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी बीकेसी ते सांताक्रुझ स्टेशन दरम्यान मेट्रोनं प्रवास करणार असल्याची माहिती आहे.
4/7

आरे ते बीकेसी या प्रवासाला मेट्रोनं केवळ 30 मिनिटांचा वेळ लागणार आहे. या मार्गावर साडे सहा मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध होईल. मेट्रो 3 ची सेवा सकाळी 6.30 वाजता ते रात्री 10.30 वाजेपर्यंत सुरु राहील. तिकीट दर 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असेल.
5/7

मेट्रो 3 च्या दिवसभरात 96 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या फेऱ्या आरे जेवीएलआर ते बीकेसी या दरम्यान असतील. यामध्ये 9 स्थानकांवर प्रवाशांना मेट्रोत प्रवेश मिळेल. या मेट्रोचा वेग 85 किलोमीटर प्रतितास इतका असेल.
6/7

आरे ते बीकेसी दरम्यान 9 मेट्रो स्थानकं भूमिगत असतील. यामध्ये बीकेसी, विद्यानगरी स्टेशन, सांताक्रुझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1, सहार रोड,छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, मरोळ नाका, एमआयडीसी , सीप्झ स्टेशन ही स्थानकं भूमिगत असतील.
7/7

मुंबई मेट्रो 3 चा प्रकल्प खर्च 37 हजार 27 कोटी रुपये आहे. या मार्गिकेवर 27 स्थानकं आहेत. त्यापैकी 26 स्थानकं भूमिगत असून 1 ग्रेड स्टेशन असेलं.
Published at : 05 Oct 2024 11:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















