मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत या रक्तदान शिबिराचं आयोजन मंडळान केलं होतं.
2/8
कोरोना व्हायरसमुळे ताडदेवमधील राज राजेश्वरी प्रतिष्ठानने चैत्र नवरात्रोत्सव रद्द करत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं.
3/8
फक्त देवीचे पुजारी नित्यनियमीतपणे पुजा-अर्चा करतात. यंदा मंडळाने सामाजिक भान राखत कोणताही उत्सव, सार्वजनिक उपक्रम न करता फक्त रक्तदानाचा आयोजन केलं होत.
4/8
जमावबंदी आणि लॉकडाऊनची एकंदर परिस्थिती पाहता सोशल डिस्टन्सिंग टाळण्यासाठी राजराजेश्वरी प्रतिष्ठान न्यासने ही स्तुत्य कल्पना अमलात आणली.
5/8
दरम्यान दरवर्षी मराठी नववर्षापासून चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. कोरोनामुळे यंदा मंडळाने फक्त देवीची स्थापना केली असून देवीच्या दर्शनाची रांग बंद करण्यात आली.
6/8
महाराष्ट्र राज्यात काही दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उरलेला असुन या अनुषंघाने जसलोक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होत.
7/8
यामुळे एकमेकांशी होणारा संपर्क टाळण सहज शक्य झालं. या शिबिराला दिवसभरात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
8/8
कोणत्याही नागरिकाला रक्तदान करावयाचे असल्यास त्यांनी मंडळाशी संपर्क करणे आवश्यक होते. त्यानंतर मंडळाकडून त्यांना एक निश्चित अशी वेळी देण्यात येत होती.