एक्स्प्लोर
Business Woman : घरगुती टिफीन सर्व्हिसेस ते क्लाऊड किचन; उद्योजक महिलेचा 'चविष्ट प्रवास'
Business Woman : महिलांनी उद्योजक बनावं असं अनेकांना वाटतं. प्रतिकूल परिस्थितीवर मात देत स्वत:चा उद्योग क्लाऊड किचनपर्यंत पोहोचवणाऱ्या सुप्रिया शिरसाट यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

Business Woman : घरगुती टिफीन सर्व्हिसेस ते क्लाऊड किचन; उद्योजक महिलेचा चविष्ट प्रवास
1/7

सुप्रिया शिरसाट यांच्या व्यवसायाची सुरुवात ऑफिसला डब्बे पुरवण्यापासून झाली. नंतर हेच जेवणाचे डब्बे कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये पोहोचू लागले.
2/7

जेवणाच्या डब्ब्यांना दिवसेंदिवस मागणी वाढत गेली. वाढलेल्या मागणीमुळे जेवणाच्या डब्ब्यांचं रुपांतर 'थाली'मध्ये झालं.
3/7

त्यानंतर त्यांनी घरगुती जेवण आणि प्रीमियम थाली या दोन प्रकारात जेवण देण्यास सुरुवात केली.
4/7

जेवणातल्या काही वैशिष्ट्यांमुळे अल्पावधीतच लोकांपर्यंत त्यांच्या रुचकर जेवणाची माहिती अनेकांपर्यंत पोहचली. जेवण ताजं आणि चविष्ट असल्याने लोकांच्या पसंतीस उतरले.
5/7

कोथंबीर वडी, अळू वडी, मुंग डाळ हलवा, बिर्याणी इत्यादी पदार्थ सुप्रिया शिरसाट यांचे खास पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले.
6/7

कॉर्पोरेट ऑफिसेसला भासणारी जेवणाच्या डब्ब्याची उणीव सुप्रिया शिरसाट यांच्या 'थाली ओ मेनिया' ने भरून काढली.
7/7

घरातून मिळालेलं सहकार्य आणि उद्योगातच निर्माण झालेलं भांडवल यामुळे सुप्रिया शिरसाट यांचा क्लाऊड किचनपर्यंतचा प्रवास सहज पार करणं शक्य झालं.
Published at : 22 Aug 2023 08:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
