एक्स्प्लोर
आधी लगीन लोकशाहीचं! लग्न सोडून नववधू आणि नवरदेव लागले मतदानाच्या रांगेत, पाहा फोटो
Maharashtra Gram Panchayat Election 2022
1/9

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. सकाळी 7.30 वाजता सुरु झालेली ही मतदान प्रक्रिया संध्याकाळी 5.30 वेळेपर्यंत सुरू राहणार आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.
2/9

यातच तळकोकणातील एका नववधूने आपल्या विवाहाच्या मुहूर्तापेक्षा मतदानाच्या हक्काला प्राधान्य देऊन मतदानाबद्दल गंभीर नसलेल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे.
3/9

कणकवली तालुक्यातील लोरे गावातील गीता तेली या युवतीचे तिच्या गावापासून दूर 70 किमी वर लग्नमंडपात पोचण्याची धावपळ असतानाच नववधू होण्यासाठी चाललेल्या या युवतीने मतदानाला पहिले प्राधान्य दिले. वऱ्हाडी मंडळीसह ही नवरी थेट मतदान केंद्रावर पोचली. मतदान करून नंतरच ही युवती वऱ्हाडी मंडळीसह बोहल्यावर चढण्यासाठी रवाना झाली.
4/9

संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून साकुर ग्रामपंचायत निवडणुकीत केतन पेंडभाजे या नवरदेवाने लग्नाअगोदर संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकार बजावलाय.
5/9

साकुर येथील वीरभद्र मतदान केंद्रावर जात नवरदेवाने मतदान केले असून लग्नाला येण्यापूर्वी मतदान करून या असं आवाहन देखील केलं आहे.
6/9

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावामध्ये नवरदेवाने मतदानाला हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे.
7/9

करमळी गावातील रहिवासी संतोष पाटील यांचा मतदान दिवशी विवाह होता विवाह झाल्यानंतर लगेचच मतदान केंद्रामध्ये येत संतोष पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
8/9

कोल्हापुर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथे वल्लभ चंद्रकांत भोसले आणि श्रीदेवी वल्लभ भोसले या नवदांपत्य लग्नाच्या बोहल्यावर चढताच काही वेळातच येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मधुन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.
9/9

या मतदानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
Published at : 18 Dec 2022 05:46 PM (IST)
Tags :
Maharashtra Gram Panchayat Elections Latest Updates Maharashtra Gram Panchayat Elections Live Updates Maharashtra Gram Panchayat Elections Today Palghar Gram Panchayat Elections Aurangabad Gram Panchayat Elections Gadchiroli Gram Panchayat Elections Kolhapur Gram Panchayat Elections Pune Gram Panchayat Elections Solapur Gram Panchayat Elections Satara Gram Panchayat Elections Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updatesआणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
























