एक्स्प्लोर
In Pics : प्रमोद सावंतच गोव्याचे मुख्यमंत्री, सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

प्रमोद सावंत
1/8

10 मार्च रोजी पाच राज्यांचे निकाल समोर आल्यानंतर आता एक-एक करुन राज्यांचे मुख्यमंत्री निश्चित होत आहेत. नुकतंच भाजपकडून गोव्याच्या मुख्यमंत्र्याचे नावही जाहीर करण्यात आले.
2/8

मुख्यमंत्री पदाची धुरा पुन्हा एक प्रमोद सावंत यांच्या हातीच भाजपने सोपवली आहे.
3/8

नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सावंत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
4/8

गोव्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.
5/8

काही दिवसांपूर्वी गोव्यातील विजयानंतर प्रमोद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती.
6/8

यावेळी इतर भाजप मान्यवरही त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांशी विविध विषयांवर चर्चा देखील केली होती.
7/8

सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती.
8/8

गोवा विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या भाजपच्या आमदारांची बैठकही काही दिवसांपूर्वी पार पडली होती. यावेळी जवळपास प्रमोद सावंत यांच्या नावाचीच चर्चा होती. त्यानंतर आता अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली आहे.
Published at : 21 Mar 2022 07:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
