एक्स्प्लोर
Snowfall : काश्मीर खोऱ्यासह हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, जनजीवन विस्कळीत; येलो अलर्ट जारी
Snowfall in Himachal Pradesh : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील विविध भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. जोरदार बर्फवृष्टीचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे.

Jammu Kashmir Himachal Snowfall
1/11

जोरदार बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे येथील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत एकूण 176 मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. (PC:PTI)
2/11

हिमाचलमध्ये गेल्या 24 तासांत 10 पाणी पुरवठा संयंत्र आणि 470 वीज पुरवठा संयंत्र बंद करण्यात आले आहेत. हवामान खात्यानुसार पुढील 24 तास तापमानात सातत्याने घसरण सुरू राहणार आहे. (PC:PTI)
3/11

जम्मू आणि काश्मीरमध्ये हिमवर्षाव आणि भूस्खलनामुळे, काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागाशी जोडणारा एकमेव 270 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 बंद झाला आहे. (PC:PTI)
4/11

लाहौल स्पिती, किन्नौर, चंबा, कुल्लू आणि किन्नौरमध्ये गेल्या 24 तासांत मोठ्या बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने डोंगराळ भागात येलो अलर्ट जारी केला आहे. (PC:PTI)
5/11

लाहौल स्पिती येथे सर्वात कमी तापमान असून ते उणे 3.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हिमाचलच्या इतर भागात तापमान खूपच कमी राहिले. (PC:PTI)
6/11

कुकुमसेरीमध्ये उणे 1.3 अंश, कल्पामध्ये -0.4 अंश, नारकंडामध्ये -0.2 अंश, कुफरीमध्ये 2.2 अंश, मनालीमध्ये 2.6 अंश, डलहौसीमध्ये 1.9 अंश आणि शिमलामध्ये 5 अंश तापमान होते. 5 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
7/11

(PC:ANI)
8/11

हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पर्वतीय प्रदेशातील राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा येलो अलर्ट जारी केला आहे. (PC:ANI)
9/11

पर्वतीय भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, सखल आणि मैदानी भागात हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. (PC:ANI)
10/11

उत्तर भारतातील हिमाचल, काश्मीर आणि उत्तराखंड या तीन राज्यांत जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच आहे.
11/11

काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे ठप्प झाला आहे. NH-1 वरील पंथियाल कॅफेटेरिया वळण आणि दलवासजवळ 200 हून अधिक वाहने अडकली आहेत.
Published at : 11 Feb 2023 09:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion