एक्स्प्लोर
PHOTO: आरक्षणाच्या मागणीसाठी लिंगायत पंचमसाली समाजाची कर्नाटक विधानसौधवर धडक, लाखोंचा सहभाग
ओबीसी अंतर्गत 2A (15 टक्के) आरक्षणाचा लाभ आपल्या समाजाला मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. लिंगायत पंचमसाली समाजाचा सध्या 3B (5 टक्के आरक्षण) या प्रवर्गात समावेश आहे.

Panchamasali Lingayat Protest
1/10

बेळगावातील विधानसौध या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आपल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी लिंगायत पंचमसाली (Panchamasali Lingayat) समाजाने मोर्चा काढला असून या मोर्चाला हिरे बागेबाडी येथून प्रारंभ झाला.
2/10

या मोर्चामध्ये लाखो लिंगायत पंचमसाली बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत. कुडल संगम येथील श्री श्री मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली लाखो बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत.पंचमसालीना आरक्षण मिळालेच पाहिजे, हर हर महादेव अशा घोषणा मोर्चात सहभागी झालेल्यांनी दिल्या.
3/10

लिंगायत पंचमसाली समाजाने आरक्षणाची मागणी करत मोर्चा काढला आहे. पंचमसाली लिगायत समाज हा वीरशैव लिंगायत समाजाचा एक उपसमुदाय मानला जातो.
4/10

ओबीसी अंतर्गत 2A (15 टक्के) आरक्षणाचा लाभ आपल्या समाजाला मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. लिंगायत पंचमसाली समाजाचा सध्या 3B (5 टक्के आरक्षण) या प्रवर्गात समावेश आहे.
5/10

जर मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण दिलं तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार असल्याचं श्री श्री मृत्युंजय स्वामी यांनी म्हटलंय.
6/10

लिंगायत पंचमसाली समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्याचं सांगितलं जातंय. भाजप नेत्यांची या समाजावर पकड आहे.
7/10

लिंगायत पंचमसाली समाजाच्या आरक्षणाची मागणी जुनी आहे. गेल्या अनेक वर्षापासून या समाजाला ओबीसी अंतर्गत 2A मध्ये समाविष्ठ करावं अशी मागणी केली जात आहे.
8/10

कर्नाटकातील सहा कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 85 लाख लोकसंख्या ही लिंगायत पंचमसाली समाजाची असल्याचा दावा केला जात आहे. तसेच लिंगायत समाजातील 70 टक्के लोकसंख्या ही पंचमसाली असल्याचं सांगितलं जातंय.
9/10

लिंगायत पंचमसाली समाजाती एकूण लोकसंख्या 17 टक्के आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्ष आग्रही आहेत.
10/10

कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात या मागणीवर आज-उद्या सकारात्मक निर्णय होणार असल्याचं राज्य सरकारकडून संकेत देण्यात आले आहेत.
Published at : 22 Dec 2022 05:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
