एक्स्प्लोर
Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली; फोटोंमधून पाहा भयानक स्थिती
Delhi flood: दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आजूबाजूच्या भागात पाणी भरू लागलं आहे. एनडीआरएफ पथक लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षितस्थळी हलवत आहेत.

Yamuna Flood
1/14

हरियाणातील हथिनी कुंड बॅरेजमधून सतत पाणी सोडल्यामुळे दिल्लीतील यमुनेची पातळी सकाळी 7 वाजता 208.46 मीटर पर्यंत पोहोचली.
2/14

यंदा यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 45 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. 1978 मध्ये यमुनेची पाण्याची पातळी 207.49 च्या आसपास मोजली गेली होती.
3/14

दिल्लीच्या रिंग रोडला पूर आला असून हे ठिकाण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे.
4/14

पूरसदृश परिस्थिती पाहता लोकांना जुन्या दिल्लीतील निगमबोध घाटाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे, या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
5/14

एनडीआरएफच्या सुमारे 12 पथकं लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवत आहेत.
6/14

सखल भागात पाणी साचल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
7/14

केंद्रीय जल आयोगानुसार हरियाणा बॅरेजमधून येणाऱ्या पाण्याची पातळी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे.
8/14

दिल्लीचा लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय.
9/14

दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीमुळे यमुनेच्या आसपासच्या भागातील शाळा रविवारपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.
10/14

दिल्लीच्या यमुना बाजार, आईटीओ, राजघाट, सिव्हील लाईन, कश्मीरी गेट यांसारख्या अनेक परिसरात पाणी साचलंय.
11/14

एनडीआरएफ पथक लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षितस्थळी हलवत आहेत.
12/14

दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सखल भागात अडकलेल्या 300 जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
13/14

नोएडा जिल्हा प्रशासनाकडून लोकांना यमुनेच्या आसपास जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
14/14

दिल्लीतील अनेक परिसरातील वाहतूक खोळंबल्यानं नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.
Published at : 13 Jul 2023 03:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
