Gadchiroli News : कळपातून भरकटलेला रानटी हत्ती रस्त्यावर आला आणि लोकांची तारांबळ उडाली,पाहा फोटो
हा एकूण 23 हत्तींचा कळप असून यांच्या उपद्रवामुळे सीमाभागातील घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कळपातील एक हत्ती भरकटून रस्त्यावर आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळाले.
भरकटलेल्या या हत्तीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
कुरखेडा तालुक्यात मागील आठवडाभरापासून रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे.
या भागात हत्तींनी अनेक घरांची मोडतोड केली असून शेतीचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.
दरम्यान या कळपातून भरकटलेल्या एका रानटी हत्तीचा आरमोरी मार्गावर मुक्त संचार पाहायला मिळाला.
यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हत्तीचा मुक्तसंचार मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपला आहे.
सुदैवाने हत्तीने कोणावरही हल्ला केला नाही.
त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मात्र, आपल्या दिशेने येणाऱ्या हत्तीला पाहून काही वेळेसाठी उपस्थितांची तारांबळ उडाली होती.