Ambabai : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी 70 लाखांचे दान
Ambabai Mandir : गेल्या तीन दिवसांपासून मंदिरामधील दानपेटींमधील मोजदाद सुरु होती. एकूण 70 लाख 622 रुपये भक्तांनी देवीच्या चरणी अर्पण केले आहेत. यामध्ये चिल्लरचा सुद्धा समावेश आहे.

Ambabai Mandir
1/10
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या दोन ते अडीच महिन्यांनी उघडून मोजणी केली जाते.
2/10
गेल्या तीन दिवसांपासून मंदिरामधील दानपेटींमधील मोजदाद सुरू होती.
3/10
एकूण 70 लाख 622 रुपये भक्तांनी देवीच्या चरणी अर्पण केले आहेत.
4/10
यामध्ये नाण्यांचाही समावेश आहे.
5/10
पहिल्या दिवशी पेटी नंबर चार, सहा आणि आठ क्रमांकाची पेटी मोजण्यात आली.
6/10
यामध्ये 21 लाख 41 हजार 422 रक्कम जमा झाली होती.
7/10
दुसऱ्या दिवशी पेटी क्रमांक एक, दोन, पाच, अकरा आणि बारा नंबरची पेटी मोजण्यात आली.
8/10
या चार पेट्यांमधून 36 लाख 45 हजार 454 रुपये दान जमा झाले होते.
9/10
आज तिसऱ्या दिवशी पेटी क्रमांक तीन आणि सातची मोजणी करण्यात आली.
10/10
यामध्ये 12 लाख 13 हजार 746 रुपये जमा झाले होते.
Published at : 09 Aug 2023 06:53 PM (IST)