Gadchiroli : हत्तींचे कळप करतायेत पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात हत्तीच्या (elephants) कळपांनी हैदोस घातला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे हत्तीचे कळप मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
देसाईगंज तालुक्यापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या हलबी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांची जंगली हत्तीच्या कळपानं मोठी नासाडी केलीय. उभ्या पिकात हत्तींनी उत्पात मांडलाय.
शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन
हत्तींनी पिकांचं नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना अत्यल्प तुटपुंजी आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.
तात्काळ मदत न दिल्यास संपुर्ण कुटुंबासह सामुहिक देहत्याग करण्याचा इशारा हलबी पिंपळगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
नुकसानीच्या प्रमाणात किमान 50 हजार रुपये प्रती एकर आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी,
22 सप्टेंबर 2023 पासून जवळ जवळ 8 ते 10 दिवस जंगली हत्तीच्या कळपाचा हलबी पिंपळगाव शेतशिवार परिसरात उत्पात सुरु होता.
जंगली हत्तींनी पिक तयार झाले असताना उभ्या पिकात उत्पात मांडून तोंडघशी आलेले पिक नेस्तनाबूत करुन टाकले आहे.