Hair Care Tips : केसांची निगा राखण्याकरता करा 'हे' उपाय

आयुर्वेदात फक्त औषधी वनस्पतींच्या गुणधर्मांबद्दलच नाही तर खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीबद्दलही बरेच काही सांगितले गेले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आयुर्वेदानुसार केसांची काळजी कशी घ्यायची ज्यामुळे केसांच्या सर्व समस्या नाहिशा होऊ शकतात. पाहा.

6 वाजता केसांना तेल लावावे. असे केल्याने तणाव दूर होईल आणि केस मजबूत आणि चमकदार होतील.
आठवड्यातून दोनदा केसांना शॅम्पू करण्यापूर्वीही तेल लावू शकता. लक्षात ठेवा की केस धुतल्यानंतर तेल लावणे टाळावे.
केसांना नियमित तेल लावल्याने डोक्यातील कोंडा आणि खाज येण्याची समस्या दूर होते. कोमट पाण्याने केस धुवा. तुम्हाला कोंड्याच्या समस्येपासून पूर्ण आराम मिळेल.
रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. असे केल्याने तुम्हाला चांगली झोप लागते.
अंड्यातील पिवळ बलक, एक कप मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करा आणि ते केसांना लावा.
दोन चमचे दही, एक चमचा लिंबू आणि एक चमचा व्हिनेगर चांगले मिसळा. त्यानंतर, हे मिश्रण आपल्या केसांना लावा. हे तुमच्या केसांवरील कोंडा कमी करेल.
एक पिकलेले केळ, अर्धा कप दही आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. सर्व घटक चांगले मिसळा आणि केसांना लावा. 45 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
दोन चमचे खोबरेल तेल आणि मध घ्या आणि त्यात एक चमचा व्हिनेगर मिसळा. हे केसांवर लावा. आता केस धुवा.