Bhandara News : पावसामुळं रस्त्यावरील डांबर वाहून गेलं, गावकऱ्यांना रहदारी करण्यास अडचण
प्रशांत देसाई
Updated at:
21 Aug 2023 01:27 PM (IST)
1
पावसामुळे नदीनाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
परिणामी लाखनी तालुक्यातील पालांदुर ते ढिवरखेडा येथील नालाही ओव्हरफ्लो झाला.
3
यामुळे या पुलावरील डांबररस्ता खचला आहे.
4
अगदी चार महिन्यांपूर्वी पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून या रस्त्याचे काम करण्यात आले होते.
5
पण हे कामकाज निकृष्ट दर्जाचे असल्याचे यामुळे म्हटलं जात आहे.
6
पावसामुळे या रस्त्यावरील डांबर देखील वाहून गेले आहे.
7
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे देखील पडल्याचं दिसून येत आहे.
8
त्यामुळे या रस्त्यावरुन रहदारी करण्यास देखील त्रास होत आहे.
9
तर प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
10
तसेच आता प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.