Times Now ETG Survey: जर आजच लोकसभा निवडणुका घेतल्या, तर महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती? सर्वेक्षणाचा धक्कादायक अहवाल
सुमारे 60 टक्के लोकांचं फोनवरुन, तर 40 टक्के लोकांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार, गेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत यावेळी एनडीएला बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांमध्ये नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया 6 राज्यांपैकी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात फक्त दोन ठिकाणी एनडीएची सत्ता आहे, उर्वरित चार राज्यांमध्ये राजस्थान, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी आघाडी इंडिया पक्षांचं सरकार आहे. मात्र, या सर्वेक्षणात विरोधकांच्या इंडियालाही इथे विशेष फायदा झाल्याचं दिसून आलेलं नाही.
या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 198 जागा आहेत, 2019 मध्ये 163 जागांवर लढत झाली आणि NDA जिंकली. दुसरीकडे, सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, एनडीए 120 ते 134 जागा जिंकू शकते. त्यानुसार एनडीएला 29 ते 43 जागांचं नुकसान होऊ शकते.
सर्वेक्षणानुसार, एनडीएला राजस्थानमध्ये 20 ते 22 जागा, मध्य प्रदेशात 24 ते 26 जागा, महाराष्ट्रात 1 ते 2 जागा, बिहारमध्ये 22 ते 24 जागा, पश्चिम बंगालमध्ये 16 ते 18 जागा आणि झारखंड राज्यात 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित आहे.
सर्वेक्षणानुसार, विरोधकांच्या इंडियाला राजस्थानमध्ये 2 ते 3 जागा, मध्य प्रदेशात 3 ते 5 जागा, महाराष्ट्रात 15 ते 19 जागा, बिहारमध्ये 16 ते 18 जागा, पश्चिम बंगालमध्ये NDAला 23 ते 27 जागा आणि झारखंडमध्ये 2 ते 4 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे.
यापैकी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात एनडीएचं सरकार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं आणि कमलनाथ मुख्यमंत्री होते. राज्यातील 29 जागांपैकी एनडीएनं 28 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेसोबत युती होती आणि एनडीएनं 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या.
याशिवाय बिहारमध्ये 40 पैकी 39, झारखंडमध्ये 14 पैकी 12, राजस्थानमध्ये 25 पैकी 25 आणि पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा एनडीएनं जिंकल्या होत्या.