औक्षण आणि 'लाभले आम्हास भाग्य'चं गायन, जपानमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं विमानतळावर मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं.

Devendra Fadnavis

1/7
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत.
2/7
जपानमध्ये पोहोचल्यावर देवेंद्र फडणवीस यांचं विमानतळावर मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं.
3/7
देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण करण्यात आलं. सोबतच यावेळी लाभले आम्हास भाग्य या गीताच गायन देखील यावेळी झालं.
4/7
जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्यासारखं वाटलं, त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
5/7
20 ते 25 ऑगस्ट असा देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असून ते जपानमध्ये गुंतवणूकदारांना भेटणार आहेत.
6/7
याशिवाय देवेंद्र फडणवीस हे जपानचे पंतप्रधान फुमयो किशिदा यांनाही भेटण्याची शक्यता आहे.
7/7
जपान सरकारने फडणवीस यांना शासकीय अतिथी म्हणून निमंत्रण दिलं आहे.
Sponsored Links by Taboola