Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara News : गोसीखुर्द धरणाचे 15 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं या नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत.
या धरणामधून सध्या 62 हजार 935 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले होते.
त्यामधून जवळपास दीड लाखांहून अधिक क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
मात्र, त्यानंतर पाऊस थांबल्यानं 33 पैकी 31 दरवाजे बंद करण्यात आले होते.
फक्त दोनच दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता.
पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यानं गोसीखुर्द धरणाचे दरवाजे प्रशासनाने उघडले आहेत.
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं आणि धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढल्यानं गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील 9 तासात धरणातून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.