Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani News : परभणीत लागवड केलेली चार एकर केळी रानडुक्करांनी फस्त केली, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
04 Aug 2023 09:40 AM (IST)
1
परभणी जिल्ह्यातील विविध भागात वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तालुक्यातील शहापूर येथील तब्बल 4 एकरवर लागवड केलेली केळी रानडुक्करांनी रात्रीतून फस्त केली.
3
ज्यामुळे शेतकरी सुरेश मोरे आणि राणी मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
4
याबाबत दोन्ही शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार केली अन् तात्काळ या रानडुक्करांचा बंदोबस्त करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
5
यंदा केवळ शहापूरच नाही तर जिंतूर, सेलु, गंगाखेड आदी तालुक्यात रानडुक्करे, रोही, हरणं आदी वन्यप्राण्यांकडून शेतीपिकांचे मोठे नुकसान केले जात आहे.
6
अनेक तक्रारी करुनही वन विभाग मात्र याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.