एक्स्प्लोर

बैलगाडीतून वऱ्हाडी अन् टाळ मृदंगाचा गजर, अहमदनगरमधील अनोख्या लग्नाची चर्चा

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे आज एक अनोखा विवाहसोहळा पार पडला.

marriage

1/10
Ahmednagar latest News Update : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे आज एक अनोखा विवाहसोहळा पार पडला.  येथील गाडेकर आणि भवार कुटुंबातील देवेंद्र भवार आणि पल्लवी गाडेकर यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने चक्क वीस बैलगाडीतून वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी दाखल झाले.

2/10
त्याशिवाय नवरदेव आणि नवरीने देखील पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. या विवाह सोहळ्याची सध्या परिसरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

3/10
शिंगवे केशव येथील प्रल्हाद भवार यांचे चिरंजीव देवेंद्र भवार आणि याच गावातील हभप गंगाधर महाराज गाडेकर यांची कन्या पल्लवी गाडेकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न सोहळ्यादरम्यान वाहनांमधून तसेच फटक्यांच्या आतिषबाजीतून होणारे प्रदूषण आणि डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळत पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

4/10
लग्नाचे वऱ्हाडी बैलगाडीतून आले. यासाठी  20 बैलगाड्या सुंदर पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. एका मागून येणाऱ्या बैलगाड्या त्यात बसलेले वऱ्हाडी, सर्वात पुढे नवरदेव देवेंद्रही बैलगाडीतच अशी ही वऱ्हाडी मंडळी गावातील श्री क्षेत्र दत्त मंदिराकडे निघाली.

5/10
विशेष म्हणजे वऱ्हाडीचे स्वागत करण्यासाठी टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला. तर महिला आणि वारकरी मुलांनी फुगडी खेळत वाजत- गाजत वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी दाखल झाले.

6/10
नवरदेव देवेंद्र भवार याने संत तुकाराम महाराजांप्रमाणे वेशभूषा परिधान केली होती तर नवरी मुलगी पल्लवी हिने राजमाता जिजाऊ यांच्या प्रमाणे वेशभूषा केली होती. देवेंद्रच्या हातात विना तर पल्लवीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते.

7/10
हा विवाह सोहळा जुन्या काळातील विवाह सोहळ्याची आठवण करून देणारा होता. आपण वारकरी संप्रदायातील असल्याने अशा अनोख्या पद्धतीने विवाह होत असल्याने आनंद होत असल्याचे नवरदेव देवेंद्र भवार याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

8/10
तर डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखत अतिशय अनोख्या पद्धतीने आपल्या मुलीचा विवाह सोहळा व्हावा अशी आपली इच्छा असल्याने आपण हे नियोजन केल्याचे नवरी मुलगी पल्लवीचे वडील हभप गंगाधर महाराज गाडेकर यांनी सांगितले.

9/10
केवळ समाजप्रबोधन न करता आपण स्वतः आचरणात या सर्व गोष्टी आणायला हव्यात असं त्यांनी सांगितले. तर या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील उपस्थित होते.

10/10
त्यांनी देखील या विवाह सोहळ्याचे कौतुक केले. गाडेकर महाराज हे नेहमीच किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतातच मात्र त्यांनी स्वतः आपल्या मुलीचे असे पारंपरिक पद्धतीने लग्न लावून समाजापुढे एक आदर्श ठेवल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी म्हंटले आहे.सध्या या लग्नाची परिसरातच नाही तर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

अहमदनगर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget