एक्स्प्लोर
Worship Rules : महिलांनी देवपूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? 'या' चुका केल्यास होत नाही देवाची कृपा
Worship Rules for Women : हिंदू धर्मात स्त्रियांना देवपूजा करताना काही नियम घालून दिलेले आहेत. महिलांनी या नियमांचं पालन न केल्यास पूजेचे शुभ परिणाम मिळत नाहीत.
Worship Rules for Women
1/8

हिंदू धर्मात देवपूजेला विशेष महत्त्व आहे. परंतु पूजापाठ नियमानुसार केला तरच पूजेचं शुभ फल प्राप्त होतं. पूजेदरम्यान केलेली एक छोटीशी चूकही फार त्रासाची ठरू शकते आणि त्याचं पाप आपल्याला भोगावं लागतं.
2/8

स्त्री आणि पुरुष दोघांनीही पूजेशी संबंधित महत्त्वाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. हिंदू धर्मात विशेषत: महिलांसाठी पूजेशी संबंधित काही खास नियम आहेत, ज्यांचं पालन सर्व महिलांनी केलं पाहिजे.
3/8

महिलांनी मासिक पाळी दरम्यान पूजा करू नये. या दिवसात मंदिरांमध्ये जाणं आणि देवाशी संबंधित झाडं, वनस्पतींना स्पर्श करणं टाळलं पाहिजे. कोणतीही महत्त्वाची पूजा किंवा व्रत असेल तर तुम्ही ते घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता.
4/8

हनुमानाची पूजा करताना महिलांनी त्यांच्या मूर्तीला हात लावू नये किंवा सिंदूर किंवा चोळा अर्पण करू नये. कारण हनुमान ब्रह्मचारी आहे. महिलांनी हनुमानजींच्या पायांनाही स्पर्श करू नये.
5/8

महिलांच्या पूजेच्या वेळी नारळ फोडू नये. शास्त्रामध्ये नारळ हे एका बीजाप्रमाणे मानलं गेलं आहे, ज्यापासून नवीन झाडाचा जन्म होतो. शास्त्रात स्त्रीला आई म्हटलं आहे, कारण ती मुलांना जन्म देते.
6/8

त्यामुळे जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला तिच्या मुलाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो, अशी मान्यता आहे. मात्र महिला नारळ फोडू शकत नसल्या तरी पूजेत नारळ अर्पण करू शकतात.
7/8

महिलांनी शनिदेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन करावं. महिलांनी शनिदेवाच्या चरणांना स्पर्श करू नये.
8/8

महिलांनी शनीला तेल अर्पण करू नये किंवा त्याच्या डोळ्यात पाहू नये, असं केल्याने शनिदोष निर्माण होतो.
Published at : 12 Jun 2024 08:03 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























