एक्स्प्लोर
Numerology: शनी देवाला प्रिय 'हा' अंक, जीवनात मिळतं अपार यश, आर्थिक सुबत्तेसोबतच सुख-शांती नांदते
Numerology Shani Dev Number: ज्योतिशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे, अंकशास्त्र. काही अंकांची जुळवाजुळव करून तुम्ही तुमची बिघडलेली गणितं पुन्हा जुळवून आणू शकता.
Numerology Shani Dev Number
1/9

अंकशास्त्रामध्ये काही विशेष अंकांबाबत सांगितलं आहे, ज्यांचा थेट संबंध शनिदेवाशी आहे. या अंकांशी संबंध असलेल्या लोकांवर शनी देवाची कृपादृष्टी नेहमीच राहते. तसेच, त्यांना त्यांच्या जीवनात अपार यश मिळतं, असं सांगितलं जातं.
2/9

अंकशास्त्रानुसार, सर्व संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे शनिदेवाचा क्रमांक 8 आहे.
3/9

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झालाय, त्यांच्यामध्ये शनिशी संबंधित गुण आणि त्यासोबतच दोषही दिसून येतात.
4/9

शनि हा सूर्यमालेतील सर्वात संथ चालणारा ग्रह आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांचा मूलांक 8 आहे, ते हळूहळू पण निश्चित यश मिळवतात आणि ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम देखील करतात.
5/9

शनिदेवाचा अंक असल्यामुळे 8 मूलांक असलेले लोक खूप मेहनत करून पैसे कमावतात. पैसा कमावण्यासोबतच त्यांच्याकडे अपार संपत्तीही जमते. अशा परिस्थितीत या मूलांकाच्या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
6/9

अशा परिस्थितीत ज्या लोकांचा मूलांक 8 आहे, त्यांनी शनिदेवाची पूजा करावी आणि आपल्या क्षमतेनुसार, शनिशी संबंधित वस्तूंचं दानही करावं. याशिवाय हनुमानजींची पूजा करावी.
7/9

शनीचा अंक असल्यामुळे मूलांक 8 असलेले लोक खूप मेहनती असतात आणि आपलं काम समर्पणानं करतात. त्यांना शिस्त आवडते. त्यांना खुशामत करणं किंवा नियम मोडणं आवडत नाही.
8/9

मूलांक 8 असलेल्या लोकांच्या नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर, त्यांचं त्यांच्या वडिलांशी फारसं जवळचं नातं नसतं आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातही त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी किरकोळ वाद होतात. तसेच, मित्र आणि कुटुंबियांशी सामान्य संबंधही आहेत.
9/9

(वर देण्यात आलेले उपाय केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही, कोणताही उपाय करण्यापूर्वी आवर्जुन तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 23 Sep 2024 08:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























