यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. रस्ते अपघातात (Accident) वाहनाची गती आणि ओव्हरटेकमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे खराब व अरुंद रस्त्यामुळेही अपघाताच्या घटना घडत आहेत. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातही भीषण अपघाताची अशीच एक घटना घडली असून आयशर ट्रक व ट्रेलर चालकाची धडक बसल्याने अपघात झाला. या अपघाताच 2 जण ठार झाले असून आयशर वाहनातून नेण्यात येत असेलल्या 70 बकऱ्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी (Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. 


यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे मालवाहू आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशरमधील 70 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने बकरामालकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, वाहनातील दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, अपघातात दोन्ही मोठ्या वाहनांचा चुरंडा झाल्याचे दिसून येते. अपघातामधील गंभीर जखमींना उपचारासाठी अर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. 


दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला. आयशर ट्रकमधील जखमी बकऱ्यांनाही गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तत्पूर्वीच मोठ्या प्रमाणात शेळ्या मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले.  


हेही वाचा


Suresh Raina: सुरेश रैनावर दुःखाचा डोंगर कोसळला...; भावासह 2 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू