Suresh Raina: भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैनावर (Suresh Raina) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या चुलत भावासह दोन जणांना रस्ता अपघातात जीव गमवावा लागला आहे. (Suresh Raina Brother Died) हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात बुधवारी रात्री हा अपघात झाला. सौरव कुमार रात्री जवळपास 10.45 वाजेपर्यंत दुकानात काम करत होता. दुकान बंद करुन घरी जात असताना ही घटना घडली. अपघातानंतर आरोपी पळून गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना बाजारपेठेतून पकडले. टॅक्सी आणि स्कूटरमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.


सदर घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्री 11.30 वाजताच्या सुमारास गग्गल येथे अज्ञात वाहनाने स्कूटरला धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव शेर सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन्ही स्कूटरस्वारांचा मृत्यू झाला, एकाचे नाव सौरव कुमार तर दुसऱ्याचे नाव शुभम असल्याचे सांगण्यात आले. सौरव गग्गल आणि शुभम हे कुठमा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. सौरव कुमार हा सुरेश रैनाचा चुलत भाऊ होता.


या अपघाताची माहिती देताना कांगडाच्या एसपी शालिनी अग्नीहोत्री यांनी सांगितले की, गग्गल पोलिस स्टेशन अंतर्गत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. स्कूटरवर बसलेल्या तरुणाला धडक देऊन टॅक्सी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. फरार आरोपीचा पाठलाग केल्यानंतर त्याला मंडईतून ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.


सुरेश रैनाचे हिमाचलमध्ये आहे माहेर-


हिमाचलचे गग्गल परिसरात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचे माहेर आहे. रैना आणि त्याच्या कुटुंबासाठी ही खरोखरच दुःखद बातमी आहे. सध्या सुरेश रैना आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे. स्पर्धेतील जवळपास सर्वच सामन्यांमध्ये तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून येतो. सुरेश रैनाची कॉमेंट्री चाहत्यांनाही खूप आवडते. त्याच्या बोलण्याच्या शैलीने चाहते प्रभावित होत आहेत.


संबंधित बातम्या:


Rinku Singh ICC T-20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी रिंकू सिंहची निवड का झाली नाही?; अखेर महत्वाची माहिती आली समोर


IPL 2024: 'ग्रुपवाद'ने खेळ बिघडवला! विश्वविजेत्या कर्णधाराने उघड केले मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूमचे 'रहस्य'


Rohit Sharma Net Worth: रोहित शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; मैदानावरील दमदार कामगिरीसोबतच भरपूर कमाई