World Sight Day 2021 : दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. या वर्षी आज म्हणजे 14 ऑक्टोबरला हा योग आला आहे. सामान्य जनतेमध्ये डोळ्यांविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच अंध व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीदानाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, वेगवेगळे नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्याकरिता जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात येतो.


मनुष्याच्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे डोळा. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीच नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात केवळ अंधार आणि अंधारचं असतो. जगभरात जवळपास एक अब्ज लोकांना डोळ्यांशी संबंधित काही ना काही आजार आहे. त्यामध्ये अंधत्वाचा समावेश आहेच, पण सोबत अनेकांना आपल्या डोळ्याला कमी दृषी आहे हेच लक्षात येत नाही. त्यावर वेळीच उपाययोजना न झाल्याने तो आजार बळावतो. वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अशा व्यक्तींच्या रोजच्या जीवनावर परिणाम होतो. 


डायबेटिस, ग्यायकोमा तसेच इतर आजारांचा परिणाम मनुष्याच्या दृष्टीवर होतो. त्यामुळे त्या व्यक्तीची दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. 


इतिहास
सुरुवातीला एका खासगी संघटनेने SightFirstCampaign या माध्यमातून  8 ऑक्टोबर 1998 रोजी पहिल्यांदा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाईन्डनेस  (IAPB) यांच्या वतीनं ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं. जगभरातील लोकांमध्ये दृष्टीबद्दल जागरुकता निर्माण करणे तसेच ज्यांना अंधत्व आहे अशांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करणे असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. 


जागतिक दृष्टी दिन साजरा करताना जागतिक आरोग्य संघटनेनेच्या वतीनं दरवर्षी एक वेगळी थीम तयार केली जाते आणि पुढच्या वर्षभर त्यावर काम केलं जातं. या वर्षी 'Love Your Eyes' ही थीम आहे. 


महत्वाच्या बातम्या :