World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. जागतिक संस्कृत दिन (World Sanskrit Day 2022) किंवा संस्कृत दिन हा विश्वसंस्कृत दिनम् म्हणूनही ओळखला जातो. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. याच भाषेचा इतिहास नेमका काय? चला जाणून घेऊयात. 


प्राचीन भारतीय भाषा : 


संस्कृत दिन हा संस्कृत या प्राचीन भारतीय भाषेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संस्कृत भाषेबद्दल ठिकठिकाणी व्याख्यानांचं आयोजन केलं जातं. या दिवसाचा उद्देश संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करणे आणि तिचं संवर्धन करणे असा आहे. संस्कृत भाषेला उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. संस्कृत भाषा ही जगभरात वापरली जाणारी भाषा आहे. त्यानुसार संस्कृत भाषेत सुमारे 102 अब्ज 78 कोटी 5 दशलक्ष शब्दांचा शब्दसंग्रह आहे.


संस्कृत दिनाचा इतिहास :


जागतिक संस्कृत दिन भारतात प्रथम 1969 मध्ये साजरा करण्यात आला. संस्कृत भाषेविषयी जागरूकता पसरवण्यासाठी तसेच या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत भाषेला भारताच्या समृद्ध संस्कृतीचे हे वैशिष्ट्य मानलं जातं. संस्कृत दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये संस्कृत भाषेचं महत्व, त्याचा प्रभाव आणि या भाषेच्या संवर्धनाविषयी चर्चा केली जाते. हिंदू संस्कृतीत पूजा आणि मंत्रांचा जप संस्कृतमध्ये केला जातो. संस्कृत भाषेचा उगम भारतात सुमारे 3500 वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. संस्कृत भाषेला देव वाणी अर्थात देवाची भाषा असेही म्हणतात. संस्कृत भाषेची मुळे इसवी सन पूर्व 2000 पर्यंत जातात.


संस्कृत दिनाचे महत्व :


प्राचीन भारतीय भाषा संस्कृत विषयी जागृती करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासह पुनरुज्जीवित करण्यासाठी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत भाषा शिकण्याचे आणि जाणून घेण्याचे महत्त्व या दिवशी सांगितलं जातं. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी समजली जाते. भारतात बोलल्या जाणाऱ्या प्राचीन भाषांपैकी ती पहिली असल्याची सांगण्यात येतं. 


महत्वाच्या बातम्या :