COP 26 : गेल्या काही दशकांपासून जागतिक तापमान वाढ होत असून ते जगासाठी अत्यंत धोकादायक आहे, याचा सर्वात मोठा प्रभाव विकसनशील देशांवर होतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ग्लासगो इथं सुरु असलेल्या COP 26 या हवामान बदलासंबंधीच्या परिषदेमध्ये ते बोलत होते. भारत शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असून देशातील नागरिकांच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने योजना आखत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नावर कृती करताना मिटिगेशनला जेवढं महत्व मिळतं तेवढं महत्व अडॅप्टेशनला मिळत नाही. त्यामुळे विकसनशील देशांवर अन्याय होतोय. वातावरण बदल किंवा जागतिक तापमानवाढ याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतो, तेच याला सर्वात प्रथम बळी पडतात."


 




हवामान बदलसंबंधी महत्वाची परिषद COP 26 ही ब्रिटनमधील ग्लासगो या ठिकाणी 31 ऑक्टोबरला सुरु झाली असून ती 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यंदा पॅरिस करारला पाच वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत त्यावर काय कृती करण्यात आली आहे, त्यावर भविष्यात कशा पद्धतीचं धोरण आखायला हवं यावर या बैठकीत उहापोह करण्यात येत आहे. 


पॅरिस करारानुसार, विकसित देशांनी 100 अब्ज डॉलर्सचा निधी देण्याचं कबुल केलं आहे. पण अद्याप तो निधी देण्यात आला नाही. त्या उलट चीन आणि भारतासारख्या देशांवर कार्बन उत्सर्जन जास्त प्रमाणात केलं जात आहे असा आरोप करण्यात येतो. त्यामुळे भारताने क्लायमेट जस्टीस ही भूमिका मांडली आहे. तसेच यूएसएफसीसीच्या Common But Differentiated Responsibilities (CBDR) या तत्वाची अंमलबजावणीही योग्य पद्धतीने केली जावी अशी मागणी भारताकडून सातत्याने केली जात आहे. 


महत्वाच्या बातम्या :