World Laughter Day 2022 : असं म्हणतात की हसण्याने माणसाचं आयुष्य वाढतं. तसेच, अनेक आजारही दूर होतात. पण सध्याच्या ताणतणावाच्या युगात प्रत्येकजण हसायलाच विसरला आहे. मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा घरातील कौटुंबिक वातावरण. घरातील तणावाचा कामावर परिणाम होतो तर कामाच्या ताणाचा वैयक्तिक आयुष्यावर. ही साखळी अशीच सुरु राहते. आज जागतिक हास्य दिनाच्या (World Laughter Day) निमित्ताने आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम हास्याचा परिणाम कसा होतो ते जाणून घ्या.
हसण्याचे काही फायदे आहेत:
वेदना कमी होतात : हसण्यामुळे वेदना कमी होतात तसेच शरीरातील एंडोर्फिन सोडल्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो.
अवयव उत्तेजित होतात : लाफ्टर थेरपीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शरीरात ताजे ऑक्सिजन घेऊ शकता. हे स्नायू, फुफ्फुस आणि हृदय उत्तेजित करते. एंडोर्फिन बाहेर पडतात, तसेच हसल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते, ज्यामुळे तुम्ही हृदयविकार टाळू शकता.
मूड चांगला राहतो : हसण्याने आपला मूडदेखील चांगला राहतो. थोड्या वेळासाठी का होईना पण आपण त्या तणावातून बाहेर येतो. आपलं दु:ख विसरतो. हसणे या मानसिक समस्यांना तोंड देण्यास आणि तुमचा स्वाभिमान सुधारण्यास मदत करते.
कॅलरीज बर्न होतात : तुम्हाला माहीत आहे का की हसण्याने कॅलरीजही बर्न होतात. जर तुम्ही दिवसातून 10 ते 15 मिनिटे हसलात तर तुम्ही सुमारे 40 कॅलरीज बर्न करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला कॅलरीज बर्न करून तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्ही दररोज 15 मिनिटे या ना त्या कारणाने हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
चांगली झोप येते : रात्री झोप येत नसेल तर त्याचे उपचारही लाफ्टर थेरपीमध्ये दडलेले आहेत. एका अभ्यासानुसार, खूप हसल्याच्या काही सेकंदात सेरेब्रल कॉर्टेक्स इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्स सोडते. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्हाला रात्री झोप येत नाही, तेव्हा झोपण्यापूर्वी एखादा कॉमेडी सिनेमा किंवा पुस्तक वाचा, यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
प्रतिकारशक्ती सुधारते : इतकंच नाही तर हसण्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते हेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे. हसण्यामुळे अँटीबॉडीज तयार करणाऱ्या टी पेशींची संख्या वाढते, ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.