Important days in 30 th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 एप्रिलचे दिनविशेष.


1870 : भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म 


भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म  30 एप्रिल 1870 रोजी झाला. भारतीय चित्रपट कलेला वैभव मिळवून देणाऱ्या दादासाहेब फाळकेंना भारतीय चित्रपटांचा जनक म्हटलं जातं. 1913 साली त्यांनी तयार केलेला पहिला मूक चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र‘ चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे. आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी 95 चित्रपटांची आणि 26 लघुपटांची निर्मिती केली.  16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांचे निधन झाले. 


1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आधिनिक काळातील संत म्हणून ओळखले जाते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील जातीभेद आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे अत्यंत प्रभावी काम केले. ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. 30 एप्रिल 1909 रोजी त्यांचा जन्म झाला तर 11 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 


1921 : जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम एक स्पेस-बेस्ड उपग्रह नेव्हिगेशन यंत्रणा आहे. या यंत्रणेमुळे पृथ्वीच्या इतरत्र कोठेही किंवा पृथ्वीच्या जवळील स्थानिक वेळ माहिती पुरविली जाते. यावर युनायटेड स्टेटस सरकारद्वारे देखरेख केली जाते. जीपीएस रिसीव्हरसह कोणालाही मुक्तपणे याचा ऍक्सेस आहे. ब्रॅडफोर्ड पार्किन्सन, रॉजर एल. ईस्टन आणि इव्हान ए. यांना जीपीएसचा शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. रॉरज यांचा जन्म 30 एप्रिल 1932 रोजी झाला होता. त्यांचा मृत्यू  8 मे 2014 रोजी झाला. 


1926 : मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म  


श्रीनिवास विनायक खळे हे मराठी संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळे यांनी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत या गीतप्रकारामध्ये आहे.'श्रीनिवास खळे' यांच्या घराण्याने सर्वसामान्य रसिकांला भावणाऱ्या भावगीतांना अमरत्व बहाल केलं.  खळे यांनी आपल्या संगीतरचनांमधून आबालवृद्ध रसिकांचे आयुष्य समृद्ध केले. शंकर महादेवनचे खळेकाका आणि आजच्या लिट्ल चॅम्प्सचे खळेआजोबा आता 'पद्मभूषण' झाले आहेत.
भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळे यांनी संगीत दिले होते. तसेच लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता.   


1987 : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याचा जन्म 


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर मधील बनसोड या शहरात झाला. रोहित शर्माचे वडील गुरूनाथ शर्मा हे एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या साठवण गृहाचे केअरटेकर होते. तर त्याची आई पोर्णिमा या गृहिणी होत्या. 1999 मध्ये रोहितच्या काकांनी त्याला एका क्रिकेट शिबरात पाठवले आणि तेथून त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला सुरूवात झाली. 2005 मध्ये देवधर करंडकमध्ये रोहितने पहिला सामना खेळला. एकदिवसीय सामन्यात रोहितच्या नावे 29 शकते आहेत. रोहितला अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर 2019 मध्ये ताला सर्वोत्म खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे.   


1878 : दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली 
अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. हे क्षेत्र महाराष्ट्र आणि  कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त या ठिकाणाला पवित्र आणि प्रासादिक मानतात. 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली.   


1913 : व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन 
 केशन दामले यांना मराठीतील व्याकरणकार आणि निबंधकार म्हणून ओळखले जाते. 7 नोव्हेंबर 1868 रोजी मालगुंड येथे त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध कवी केशवुत हे मोरे केशव दामले यांचे मोठे बंधू होते. मोरे दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हा सुमारे एक हजार पानांचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांणा आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात अनेक उदाहरणे आणि असंख शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. 30 एप्रिल 1913 रोजी त्यांचे निधन झाले.  


1945 : जर्मनीचा नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली 
जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याचा 20 एप्रिल 1889 रोजी जन्म झाला. 30 एप्रिल 1945 रोजी त्याने आत्महत्या केली. हिटलरनं केलेल्या ज्यूंच्या नरसंहारासोबत त्याच्या गोबेल्सनीतीची आजही चर्चा होते. 1934 साली तो जर्मनीचा हुकूमशहा बनला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तो त्या पदावर राहिला. त्याच्यावर अनेक संकटं आली, पण जर्मन लोकांचा त्याच्यावरील विश्वास कायम राहिला. जनतेच्या पाठिंब्याच्या बळावरच तो त्या पदावर कायम होता.  



2001 : गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन  
श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचा जन्म 21 ऑगस्ट 1924 रोजी झाला. श्रीपाद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी होते. दाभोळकर हे  गणितज्ञ होते. ते कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. 30 एप्रिल 2001 रोजी त्यांचे निधन झाले.  


2003 : मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन 
वसंत गोविंद पोतदार हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार होते. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी 1962 साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ’एका पुरुषोत्तमाचा गाथा (पु.ल. देशपांडे), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), महात्मा फुलेंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले दहा हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत ते 40 वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले. 30 एप्रिल 2003 रोजी त्यांचे निधन झाले. वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले. 


2014: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन 
खालिद चौधरी यांचा जन्म 20 डिसेंबर 1919 रोजी झाला.  बंगाली कलाकार आणि थिएटर कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी संभू मित्रा, त्रिपाठी मित्रा आणि श्यामानंद जालान यांच्यासह विविध हिंदी आणि बंगाली नाटकांचे दिग्दर्शन केले. 2012 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 30 एप्रिल 2014 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


1657: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून हे शहर लुटले 


1789: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले 


1926 : वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला 


1982 : कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले 


1995: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले