WHO On Monkeypox : कोरोनानंतर आता जगभरात मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार वेगानं सुरु आहे. जगभरातील 30 देशांमध्ये मंकीपॉक्सचा कहर वाढताना दिसत आहे. याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या वक्तव्यामुळे जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, जगभरीतल 30 देशांमध्ये पसरलेल्या मंकीपॉक्स विषाणूवर नियंत्रम मिळवता येईल की नाही याबाबत काही सांगणं कठिण आहे. याआधी WHOनं मंकीपॉक्सवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असं म्हटलं होतं. मात्र आता संघटनेनं यू-टर्न घेतल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयाचे प्रमुख डॉ. हंस क्लुगे यांनी सांगितलं की, 'मंकीपॉक्सचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकता येईल की नाही याबाबत अद्याप आम्हाला माहित नाही.' आरोग्य अधिकार्‍यांनी मंकीपॉक्सचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाची आणि तत्काळ कारवाई करणं आवश्यक आहे. क्लुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत सुरू झालेला मांकीपॉक्सचा उद्रेक आता जगभरात पसरला आहे. युरोप हा मंकीपॉक्स विषाणूच्या उद्रेकाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे.


लैंगिक संबंधातून पसरतो मंकीपॉक्स?
क्लुगे यांनी सांगितलं की, मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर लैंगिक क्रियेद्वारे पसरत आहे. संसर्ग झालेल्यांमध्ये प्रामुख्याने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या समावेश होतो. दरम्यान, मंकीपॉक्स विषाणू वीर्य किंवा योनीतून द्रवपदार्थाद्वारे देखील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


जगभरात मंकीपॉक्सचा संसर्ग वाढण्याची शक्यता
क्यूज यांनी इशारा देत म्हटलं आहे, आगामी काळात अनेक उत्सव येणार आहेत. अशा वेळी लोकांनी मंकीपॉक्सबाबत जागरुकता बाळगणं गरजेचं आहे. ठोस माहिती मिळेपर्यंत असुरक्षित लैंगिक संबंध टाळण्याचं आवाहन केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या