RT-PCR-Based Kit For Detection of Monkeypox : जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा कहर वाढत चालला आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्सचे सुमारे 200 रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान भारतातून एक चांगली बातमी समोर येत आहे. एका भारतीय खासगी आरोग्य कंपनीने मंकीपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी रियल-टाइम RT PCR किट बनवलं आहे.
भारतीय खाजगी आरोग्य उपकरण कंपनी 'ट्रिविट्रॉन हेल्थकेअर'ने (Ttrivitron Healthcare) शुक्रवारी मंकीपॉक्स म्हणजेच आर्थोपॉक्स विषाणूचा (Orthopoxvirus) शोध घेण्यासाठी रिअल-टाइम RT-PCR किट विकसित करण्याची घोषणा केली. ट्रिविट्रॉन हेल्थकेअरने सांगितलं आहे की, त्यांच्या संशोधन आणि विकास पथकाने मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी आरटी-पीसीआर आधारित किट विकसित केली आहे.
मंकीपॉक्स शोधण्यासाठी RT-PCR किट
ट्रिविट्रॉनचे मंकीपॉक्स रिअल-टाइम पीसीआर किट हे चार रंगी फ्लूरोसेन्स आधारित किट आहे. हे किट एकाच नळीमध्ये चेचक आणि मंकीपॉक्समध्ये फरक करू शकते. याचा अहवाल मिळण्यास एक तास लागतो असे कंपनीनं म्हटलं आहे. चार जनुक RT-PCR किटमध्ये प्रथम गट ऑर्थोपॉक्स गटातील व्हायरस शोधून दुसरा आणि तिसरा मंकीपॉक्स आणि चेचक विषाणू वेगळे करतो.
पाहा व्हिडीओ : Monkeypox : कसा होतो मंकीपॉक्स? कुठून आला मंकीपॉक्स?
जगभरातील 9 देशांमध्ये मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), जगभरात मंकीपॉक्सच्या सुमारे 200 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 100 हून अधिक रुग्ण संशयित आहेत. जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. अमेरिकेने मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेसह ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, इस्रायल आणि स्वित्झर्लंडसह काही देशांमध्येही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युरोपियन युनियनमध्ये मंकीपॉक्सच्या 118 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युनायटेड किंग्डमनं 90 रुग्णांची नोंद केली आहे. तर अमेरिकेत मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Monkey Pox Cases : 'मंकीपॉक्स'नं जगाची धाकधूक वाढवली, अमेरिकेतही शिरकाव, 9 रुग्णांची नोंद; इतर देशांची काय परिस्थिती?
- Monkeypox Virus : मंकीपॉक्स व्हायरसची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट; महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी
- Monkeypox : कोरोनानंतर आता नव्या ‘मंकीपॉक्स’ विषाणूचा शिरकाव, काय आहेत ‘या’ विषाणूची लक्षणे? जाणून घ्या...