Fuel Price in Pakistan : पाकिस्तानातील (Pakistan) परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात (Petrol Price in Pakistan) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इथे पेट्रोलचा दर 209 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. पाकिस्तानचे अर्थ मंत्री मिफ्ताह इस्माईल (Pakistan Finiance Minister) यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 30 रुपयांची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळए पाकिस्तानात आता पेट्रोलचा दर 209.15 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. डिझेलचा दर (Diesel Price) 204.15 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. याआधीही पेट्रोलच्या दरात 30 रुपयांची वाढ करण्यात आली.


पाकिस्नानातील आर्थिक परिस्थिती श्रीलंकेसारखी होत चालल्याचं म्हटलं जात आहे. श्रीलंकेतील (Economic Crisis in Srilanka) आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट सुरु झालं तेव्हाही सुरुवातीला इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली होती.


पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून इंधनांच्या किमती वाढवण्यास मंजुरी


पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी सांगितलं की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इंधनाच्या किमती वाढवण्यास परवानगी दिली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, पंतप्रधान शाहबाद शरीफ यांनी 3 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 30 रुपये आणि रॉकेलच्या किमतीत 26.38 रुपयांनी वाढ करण्यास सांगितलं आहे. रॉकेलमुळे सरकारचं नुकसान होत नाही. मात्र पेट्रोल आणि डिझेलमध्ये सरकारचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


रशिया पाकिस्तानला इंधनाचा पुरवठा नाही


दुसरीकडे भारत रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदी करत आहे, तर रशियाने पाकिस्तानला तेल देण्यास नकार दिला आहे. यावर अर्थमंत्री म्हणाले की, मागील सरकारने रशियाशी चांगले संबंध ठेवले नाहीत, त्यामुळे देशाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ते म्हणाले की, इम्रान खान यांनी रशियाला भेट दिली, मात्र रशिया आणि पाकिस्तानमध्ये तेल करार झाल्याची कुठेही बातमी नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या