एक्स्प्लोर

S. Jaishankar: जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावले, आम्हाला चांगले शेजारी देश हवेत, पण याचा अर्थ....

S. Jaishankar in Cyprus: आम्हाला चांगले शेजारी देश हवेत, याचा अर्थ दहशतवादाला योग्य ठरवणे असा होत नसल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले.

S. Jaishankar in Cyprus: आम्हाला चांगले शेजारी देश हवेत याचा अर्थ दहशतवादाच्या दबावाला बळी पडून वाटाघाटी कराव्यात असा होत नसल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी म्हटले. सायप्रस (Cyprus) येथील भारतीय समुदायासोबत बोलताना त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सूचक इशारा दिला. जयशंकर यांनी यावेळी चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेवरही टीका केली. 

एस. जयशंकर यांनी म्हटले की, काही मुद्यांवर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. दहशतवादामुळे भारताते जेवढे नुकसान झाले आहे, तेवढे नुकसान इतर कोणत्याही देशाचे झाले नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला भारत मान्यता देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 

पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी म्हटले की, आपल्याला सर्व शेजारी देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. मात्र, दहशतवादाच्या मुद्यावर तडजोड करावी असा त्याचा अर्थ होत नाही. दहशतवादाला शस्त्र बनवून त्याचा धाक दाखवत भारताला वाटाघाटीच्या चर्चेसाठी बसवले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. 

चीनच्या मुद्यावर काय म्हटले?

चीनसोबतच्या सीमा वादाबाबत बोलताना एस. जयशंकर यांनी म्हटले की, प्रत्यक्ष ताबा रेषेला एकतर्फी पद्धतीने बदलण्यास भारताचा विरोध आहे. त्यामुळे चीनसोबत भारताचे संबंध सामान्य नाहीत असेही त्यांनी म्हटले. तवांग सेक्टरमध्ये भारत-चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षाबाबत त्यांनी सांगितले की, आपल्या सीमेवर आव्हाने आहेत. कोरोना महासाथीच्या दरम्यान या आव्हानात अधिक वाढ झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 

जयशंकर यांचा सायप्रस दौरा

 भारत आणि सायप्रसमधील राजकीय संबंधाला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सायप्रस दौऱ्यावर आहेत. सायप्रस दौऱ्यात जयशंकर यांनी सायप्रसच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. या दरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि लष्करी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

पाकिस्तानकडून भारताविरोधात प्रचाराची मोहीम 

पाकिस्तानकडून भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर अपप्रचाराची मोहीम सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान सरकारचे काही मंत्री पत्रकार परिषद घेत भारतविरोधी प्रचार करत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावट भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भारत सरकारची विचारसरणी ही हिटलरची विचारसरणी असल्याचे भुट्टो यांनी म्हटले. पाकिस्तानचे राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात गरळ ओकताना म्हटले की, भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'ने मागील दोन वर्षात 1200 हून अधिक दहशतवादी हल्ले केले आहेत. दहशतवादाचा वापर भारताइतका कोणीच केला नसेल असा आरोपही रब्बानी यांनी केला. 

महत्त्वाच्या बातम्या

Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Embed widget