नवी दिल्ली : 'हे हम है...' असं म्हणत 'हमारी पावरी हो रही है' असं म्हणारे अनेकजण हल्ली सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटीमंडळीसुद्धा त्यांच्याच अंदाजाच पावरी करताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे नेमकं प्रकरण आहे तरी काय?


काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील 19 वर्षीय दनानीर मुबीन या मुलीचा एक अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला. भारतात तर या व्हिडीओचे अनेक प्रकारही पाहायला मिळाले. ज्यानंतर दनानीर हिनं पार्टीऐवजी वापरलेला पावरी शब्द कमालीचा व्हायरल झाला. जो-तो तिचीच नक्कल करताना दिसून आलं.


भारतातून मिळणारं हेच प्रेम पाहता आता पाकिस्तानातील या तरुणीनं भारतीयांचे आभार मानले आहेत. किंबहुना या घटनेमुळं एका सकारात्मक गोष्टीसाठीही तिनं आशा व्यक्त केल्या.


'संगीत देवबाभळी' ते ‘नवे लक्ष्य’; शुभांगी सदावर्ते साकारणार पीआय मोक्षदा मनोहर मोहिते


पावरी गर्ल म्हणते...


दनानीर मुबीन, म्हणजेच पावरी गर्लच्या मते यामुळं भारत आणि पाकिस्तानमधील बहुविषयक चर्चांमध्ये वाढ होईल, काही गोष्टींना दुजोराही मिळेल. भारतीयांकडून आपल्या व्हिडीओला मिळणारं प्रेम पाहून तिनं सर्वच भारतीयांचे मनापासून आभार मानले आहेत.


दनानीर मुबीन ही पाकिस्तानातील पेशावर येथे वास्तव्यास असल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं 'ये हमारी कार है, ये हम हैं, और ये हमारी पावरी हो रही है.' असं म्हणत आपला अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यानंतर पुढं काय झालं याची अनेक उदाहरणं तुम्हीही पाहिली असतीलच.