World Wildlife Day 2021: जागतिक वाईल्डलाईफ दिवस हा दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातोय. वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातोय.


आजच्या वातावरण बदलाच्या संकटाचा पृथ्वीवरील सजीवांना मोठा सामना करावा लागतोय. त्यातच विकासाच्या नावाखाली जंगलतोड होत आहे. पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व जर टिकवायचं असेल तर वनस्पती आणि प्राणी जीवनात समतोल आवश्यक आहे.


आजच्या काळात अनेक अनेक प्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहे. मनुष्याने प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण केल्याने अनेक प्राणी पृथ्वीतलावरून नष्ट होत आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणं अत्यावश्यक आहे. प्राण्यांसोबतच अनेक वनस्पतीही लयास जात असून त्यांचंही संवर्धन होणं गरजेचं आहे.


World Day of Social Justice: का साजरा केला जातो जागतिक सामाजिक न्याय दिन? भारतीय राज्यघटनेत त्याचं काय महत्व आहे?


प्राणी आणि वन्य जीवनावर असलेला धोका लक्षात घेता 2013 साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी 3 मार्च हा जागतिक वर्ल्डलाईफ दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्या माध्यमातून पृथ्वीवरच्या प्राणी आणि वनस्पती जीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.


सध्या मनुष्याच्या अनेक कृतीमुळे प्राणी आणि वनस्पती जीवन धोक्यात आल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची गरज आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने CITES या संस्थेची निर्मितीही केली आहे.


हा दिवस साजरा करताना दरवर्षी एक थीम आयोजित केली जाते. या वर्षीच्या जागतिक वाईल्डलाईफ दिवसाची थीम ही "Forests and Livelihoods: Sustaining People and Planet" अशी आहे. पृथ्वीवरच्या अब्जावधी नागरिकांच्या, विशेषत: मूळच्या आणि स्थानिक लोकांच्या आयुष्यात या प्राणी आणि वनस्पतींचे महत्व काय आहे हे सांगण्यासाठी ही थीम वापरण्यात येत आहे.


National Women's Day in India : पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या इतिहास