Viral Video : आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करते, त्यांच्यासाठी काहीही करु शकते. पण हीच आई रागावली किंवा मुलांनी काही चुकीचं वागलं तर पायातली चप्पल काढून मारायलाही कमी करत नाही. आईची ही चप्पल तिच्या मुलांना कधी, कुठे आणि कशी पडेल याचा काही नेम नाही. असाच काहीचा प्रकार एका एअरपोर्टवर घडलेला आहे. एक तरुण आपल्या आईचे स्वागत करायला, तिला न्यायला एअरपोर्टवर गेला होता. त्याला बघताच आईने काळ आणि ठिकाण न पाहता पायातली चप्पल काढली आणि त्याला धू-धू धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घाततोय. 


काय आहे या व्हिडीओमध्ये? 
व्हायरल होणारा हा व्हिडीओ अन्वर जिबावी या तरुणाने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये एक तरुण एअर पोर्टच्या अरायव्हल गेटवर उभा आहे. त्याच्या हातात 'वी मिस यू' असं लिहिलेला बोर्ड आहे. आपल्या आईला गेटवर पाहताच तो आनंदाने पुढे येतो. त्याला पाहताच त्याच्या आईने तिच्या पायातले चप्पल काढले आणि त्याला चांगलेच धुतले. नेमक्या याच क्षणी तो व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 


 




या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 1 कोटी 32 लाख व्ह्यूज, 57 लाख लाईक्स तरल 60 हजाराहून कमेन्ट्स मिळाल्या आहेत. काही लोकांनी लिहिलंय की, आई ही आई असते. तर अनेकांनी यावर मजेशीर कमेन्ट्स केल्या आहेत.


सोशल मीडियावर काय व्हायरल  होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हीही असं काही काम करु नका की तुमची आई पायातलं काढून त्याने तुमचे गाल सुजवेल. 


संबंधित बातम्या :