नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सर्बिया दूतावासाचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं असून कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नसल्याचं ट्वीट हे हॅकरकडून करण्यात आलं असल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी आणि पाकिस्तानच्या सर्बियातील दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिलं आहे. पाकिस्तानच्या सर्बियातील दूतावासातील अधिकाऱ्यांचा पगार होत नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्याची नामुष्की ओढावली असल्याचं एक ट्वीट पाकिस्तानच्या सर्बियातील दूतावासाकडून केलं गेलं होतं. 


 




पाकिस्तानच्या सर्बियातील दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एका ट्वीटच्या माध्यमातून पाकिस्तानची अब्रु वेशीवर टांगण्यात आली होती. सर्बियातल्या पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मुलांना स्थानिक शाळेतून घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कारण मागील अनेक महिन्यांपासून महागाई आणि पाक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अधिकाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरता आली नाही. परिणामी शाळेनं मुलांना घरी पाठवल्यानं आता अधिकारी वर्ग संतापलाय. या अधिकाऱ्यांनी ट्विट करुन थेट पाक पंतप्रधान इम्रान खान यांनाच घेरलंय. अशा परिस्थितीतही अधिकारी वर्गानं आणखी किती काळ गप्प राहायचं? असा सवाल इम्रान खान यांना विचारणारं ट्विट खुद्द सर्बियातल्या पाक दूतावासाच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं होतं.  


पाकिस्तानच्या सर्बियातील दूतावासाच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "महागाईनं सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. अशात आपण इम्रान खान यांच्याकडून किती अपेक्षा करु शकतो? आपण सरकारी कर्मचारी आहोत. मागील तीन महिन्यांपासून विना वेतन काम करत आहोत. आमच्याकडे मुलांची शाळेची फी भरायलाही पैसे नाहीत. फी न भरल्यानं त्यांना शाळेतून काढून टाकलं आहे."


नंतर हे ट्वीट नंतर सर्बियातील पाक दूतावासाकडून डिलिट करण्यात आलं आहे. आात त्यावर स्पष्टीकरण देत पाकिस्तानच्या सर्बियातील दूतावासाचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :