Viral Plane Video : सध्या सोशल मीडियावर लोक धक्का मारत रनवेवरील विमान बाजूला सारत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेपाळमधील बाजुरा विमानतळावरील असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी नेपाळमधील बाजुरा विमानतळावर तारा एअरलाईन्सच्या विमानाला लोक धक्का मारत असल्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
नेपाळच्या तारा एअरलाईन्स कंपनीच्या विमानाचं बुधवारी सुरक्षित लॅंडिंग झालं. मात्र विमान रनवेवरून टॅक्सी वेकडे जात असताना अचानक विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये टायर फुटल्याचा आवाज आला. धावपट्टी आणि टॅक्सीवेच्या दरम्यान विमानाचा टायर फुटल्याने धावपट्टी ब्लॉक झाली.
अडकलेलं विमान पार्किंगच्या मार्गावर पोहोचेपर्यंत इतर कोणतंही विमान धावपट्टीवर उतरणं शक्य नव्हतं. दरम्यान, लँडींगसाठी तयार असलेल्या दुसऱ्या विमानानं धावपट्टीवर उतरण्यासाठी परवानगी मागितली. मात्र, धावपट्टी ब्लॉक असल्यामुळे बोजुरा विमानतळ दुसऱ्या विमानाला लँडींगसाठी परवानगी देणं शक्य नव्हतं. तसेच, विमान लहान आणि विमानात इंधन कमी असल्यामुळे दुसऱ्या विमानाला आकाशात जास्त वेळ झेपावणं शक्य नव्हतं.
यावेळी पूर्ण विमान रिकाम करुन तेथे उपस्थित सर्व कर्मचारी आणि प्रवाशांनी मिळून तारा एअरलाईनच्या विमानाला धक्का देत विमान पार्कींगपर्यंत पोहोचवलं, ज्यामुळे दुसऱ्या विमानाला लॅंडीग करणं शक्य झालं.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- LinkedIn : नोकरी, Job Search होणार आणखी सोपं, LinkedIn आता हिंदी भाषेमध्येही
- Koo (कू) अॅपचा एशिया पॅसिफिक क्षेत्रात सन्मान, पटकावलं सर्वात लोकप्रिय डिजिटल ब्रँड्समध्ये स्थान
- Upcoming Bike and Scooter : डिसेंबरमध्ये येणार 'या' दमदार बाईक, किंमत 60 हजार रुपयांपासून सुरु